नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात सिमेंट मिक्सरमध्ये वीज प्रवाह उतरल्याने मजूराचा शॉक लागून मृत्यू झाला. मजूरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने हा प्रकार घडला असून याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यम तिवारी व विशाल द्विवेदी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी उत्तम चौधरी (रा.फणसपाडा ता. पेठ ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. अंबड औद्योगीक वसाहतीतील बी १४ या प्लॉट वरील कारखान्यात बांधकाम सुरू आहे.
या कामावर शुक्रवारी (दि.१५) दुपारी नितीन भुसारे नामक मजूराचा मृत्यू झाला. सिमेंट मिक्स करणा-या मिक्सर मशीन मध्ये वीजप्रवाह उतरल्याने ही घटना घडली. अधिक तपास उपविरीक्षक शेवाळे करीत आहेत.