नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळालीगावात घरासमोर खेळणा-या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसांनी एकाला गजाआड केले आहे. ही घटना गुरूवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश साह (रा.देवळाली गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. देवळाली गाव परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर खेळत असतांना ही घटना घडली होती.
संशयिताने तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीने आपल्या कुटुंबियाकडे कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.