नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतजमिनीची पुन्हा फेरमोजणी करण्यासाठी ३ हजार रुपयाची लाच घेतांना शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिफाई विनोद बाळू शिंदे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांचे वडीलोपार्जि्त शेतजमिनीची ४ ऑक्टोंबर २०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आलेली होती. परंतू काही कारणास्तव तक्रारदार यांना सदर शेतजमिनीची पुन्हा फेरमोजणी करावयाची असल्याने फेरमोजणीचे अर्जासह भूमी अभिलेख कार्यालय येथे गेले होते. तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका, मी तुमचे शेतात येऊन मोजणी करून देतो, त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला ३ हजार रुपये द्या, असे सांगून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून १३ मार्च २०२४ रोजी पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे शिंदे यांनी ३ हजार रुपये लाचेची मागणी करुन मागणी केलेली लाचेची रक्कम ३ हजार रुपये १६ मार्च २०२४ रोजी पंचसाक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली, म्हणून गुन्हा. हॅश व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे.
यशस्वी सापळा कार्यवाही
*युनिट:- नंदुरबार
*तक्रारदार:-* पुरुष, वय-४२ वर्षे, रा. वरूळ कानडी त.श., ता. शहादा, जि. नंदुरबार.
*आरोपी लोकसेवक:- विनोद बाळू शिंदे, वय ४२ , पद शिपाई (वर्ग ४ ) भूमी अभिलेख कार्यालय, शहादा, जि. नंदुरबार. रा. सावखेडा ता. शहादा, जि. नंदुरबार.
लाच मागणी रक्कम:- ३,००० /- रू.
*लाचेची मागणी पडताळणी :- दि. १३/०३/२०२४
*लाच स्वीकारली :- १६/०३/२०२४ रोजी ३,०००/- रू.
*लाच मागणी कारण:-
तक्रारदार यांचे वडीलोपार्जि्त शेतजमिनीची दि. ०४/१०/२०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आलेली होती. परंतू काही कारणास्तव तक्रारदार यांना सदर शेतजमिनीची पुन्हा फेरमोजणी करावयाची असल्याने फेरमोजणीचे अर्जासह भूमी अभिलेख कार्यालय येथे गेले होते. तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका, मी तुमचे शेतात येऊन मोजणी करून देतो, त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला ३,०००/-रू. देवून द्या, असे सांगून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि.१३/०३/२०२४ रोजी पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे शिंदे यांनी ३,०००/- रू. लाचेची मागणी करुन मागणी केलेली लाचेची रक्कम ३,०००/- रू. दि.१६/०३/२०२४ रोजी पंचसाक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली, म्हणून गुन्हा. हॅश व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी :-राकेश आ. चौधरी पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार
*सापळा अधिकारी :– माधवी समाधान वाघ, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार.
*सापळा कार्यवाही पथक :- पोहवा/विलास पाटील, पोहवा/विजय ठाकरे, पोना/हेमंत महाले व पोना/सुभाष पावरा सर्व नेम. ला.प्र.वि., नंदुरबार