इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदमध्ये लोकसभेच्या देशातील ५४३ लोकसभा मतदार संघातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर त्यांनी जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही कार्यक्रम जाहीर केला. त्याचप्रमाणे देशातील २६ रिक्त विधानसभेच्या जागेवर निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते ३० जून या कालावधीत ७ टप्प्यात होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील निवणुका या पाच टप्यात होणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल तर पाचवा टप्पा हा २० मे रोजी असणार आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका पाच टप्यात
पहिला टप्पा – १९ एप्रिल २०४ – रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदीय, गडचिरोली – चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – २६ एप्रिल २०२४ – बुलडाणा. अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिक, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – ७ मे २०२४– रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी – सिंधदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – १३ मे २०२४– नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – २० मे २०२४- धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदार संघ
मतमोजणी – ४ जून २०२४
९७ कोटी नोंदणीकृत मतदार
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नवनियुक्त आयुक्त ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू हे उपस्थित होते. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २०१९ लोकसभेप्रमाणेच या निवडणुकाही सात टप्यात होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, आमच्याकडे ९७ कोटी नोंदणीकृत मतदार, १०.५ लाख मतदान केंद्र, १.५ कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम, ४ लाख वाहने आहेत. त्याचप्रमाणे १.८ कोटी तरुण पहिल्यांदा मतदान आहेत. २०-२९ वयोगटातील १०.४७ कोटी मतदार आहेत.
हे आहे निवडणुकीचे टप्पे
पहिला टप्पा -१९ एप्रिल २०२४
दुसरा टप्पा – २६ एप्रिल २०२४
तिसरा टप्पा – ७ मे २०२४
चौथा टप्पा – १३ मे २०२४
पाचवा टप्पा – २० मे २०२४
सहावा टप्पा – २५ मे २०२४
सतवा टप्पा – १जून २०२४
मतमोजणी – ४ जून २०२४