इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदमध्ये लोकसभेच्या देशातील ५४३ लोकसभा मतदार संघातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर त्यांनी जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही कार्यक्रम जाहीर केला. त्याचप्रमाणे देशातील २६ रिक्त विधानसभेच्या जागेवर निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते ३० जून या कालावधीत ७ टप्प्यात होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नवनियुक्त आयुक्त ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू हे उपस्थित होते. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २०१९ लोकसभेप्रमाणेच या निवडणुकाही सात टप्यात होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, आमच्याकडे ९७ कोटी नोंदणीकृत मतदार, १०.५ लाख मतदान केंद्र, १.५ कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम, ४ लाख वाहने आहेत. त्याचप्रमाणे १.८ कोटी तरुण पहिल्यांदा मतदान आहेत. २०-२९ वयोगटातील १०.४७ कोटी मतदार आहेत.
पहिला टप्पा -१९ एप्रिल २०२४
दुसरा टप्पा – २६ एप्रिल २०२४
तिसरा टप्पा – ७ मे २०२४
चौथा टप्पा – १३ मे २०२४
पाचवा टप्पा – २० मे २०२४
सहावा टप्पा – २५ मे २०२४
सतवा टप्पा – १ जून २०२४
मतमोजणी – ४ जून २०२४