इंडिया दर्पण ऑलनाईन डेस्क
मुंबई महानगर पालिकेतील खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांची ८८ लाख ५१ हजाराची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
या कारवाईबाबत ईडीने या कारवाईची माहिती दिली आहे. BMC खिचडी प्रकरणातील PMLA, 2002 च्या तरतुदींनुसार ED, मुंबईने तात्पुरत्या स्वरुपात मुंबई येथे निवासी सदनिका आणि जिल्हा-रत्नागिरी येथील आरोपी, सूरज चव्हाण यांच्या मालकीच्या शेतजमिनी असी एकूण ८८ लाख ५१ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकी घोषित होण्यासाठी अवघे काही तास बाकी असतांना ईडीने ही माहिती देत ठाकरे गटाला धक्का दिला आहे.