वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सोशल मीडिया वरती कधी वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ लक्षवेधी असतात. सध्या असाच व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या आजारी असलेल्या मालकाला भेटण्यासाठी थेट रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हत्ती आपल्या मालकाला भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल होतो. पण आपल्या अवाढ्यव शरीरामुळे हत्ती चक्क गुडघ्यांवर बसून रुग्णालयात मालकाला पाहायला आला. हत्ती आणि त्याच्या मालकामधील हे नाते पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून मानव आणि पशूमधील नातं हे लक्षवेधी व चर्चेचे ठरले आहे. सोशल मीडियावर हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ब-याच जणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हत्तीचा हा भावूक करणारा व्हिडिओ सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.