सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पाच हजार कोटी मूल्य असलेल्या या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन व उद्घाटन

by Gautam Sancheti
मार्च 16, 2024 | 11:59 am
in संमिश्र वार्ता
0
ceceebc5 453b 4f42 a694 ed910bb20aba 1140x570 1 e1710570550644

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहात असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सिडकोतर्फे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोड मार्ग आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमीपूजन त्याचप्रमाणे भूमीपुत्र भवन, आणि प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी हिताच्या प्रकल्पांचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या विकास प्रकल्पांचे एकूण मूल्य सुमारे 5 हजार कोटी रुपये आहे.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, सर्वश्री आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, श्रीमती मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, सिडको चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप ढोले आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकासकामे होत असून नवी मुंबईमध्ये उभी राहणारी विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) ही राज्याकरिता अश्वशक्ती आहे. महाराष्ट्र शासनाने अटल सेतू सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या उद्दिष्टाला हातभार लावून सिडकोनेही परिवहनाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. विजय सिंघल यांनी सिडकोच्या उद्घाटन व भूमीपूजन होत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तेथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासदेखील थेट जोडणी मिळणार आहे. खारघर-तुर्भे जोड मार्ग हा 5.4 कि.मी. लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.

उलवे येथील भूमीपुत्र भवन हे नवी मुंबईतील स्थानिक भूमीपुत्रांना त्यांच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे. याचबरोबर या भवनाच्या माध्यमातून स्थानिकांना त्यांचे विविध सोहळे व कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काची जागा प्राप्त होणार आहे. उलवे किनारी मार्ग हा अटल सेतू (एमटीएचएल) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा सहा पदरी मार्ग विकसित करण्यात येत आहे. नेरूळ येथे प्रवासी जलवाहतूक टर्मिनस विकसित करण्यात आले असून येथून नवी मुंबई ते दक्षिण मुंबई आणि कोकण यादरम्यान रो-रो आणि स्पीड बोट सेवा लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय नेरूळ, नवी मुंबई येथून मुंबई (भाऊचा धक्का) Domestic Cruise Terminus (DCT) तसेच एलिफंटा गुंफा, मांडवा, रेवस इत्यादी ठिकाणी जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे या प्रदेशांदरम्यान प्रवासाचे अंतर लक्षणीयरित्या कमी होणार आहे. तसेच पर्यटकांनाही या ठिकाणाला भेट देऊन रम्य सागरी प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे, अशी माहिती उपस्थितांना दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अडीच लाख ग्रामीण टपाल सेवकांसाठी ही आहे आर्थिक सुधारणा योजना

Next Post

अरे व्वा…आजारी मालकाला भेटण्यासाठी हत्ती गेला रुग्णालयात (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manse1
संमिश्र वार्ता

मनसेने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह तीन जणांची केली पक्षातून हकालपट्टी

ऑगस्ट 25, 2025
निबंधक भागीदारी संस्था संकेतस्थळाचा शुभारंभ 1 2 1024x604 1
संमिश्र वार्ता

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ कार्यान्वित; आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0292 1 e1756121671326
इतर

काठे गल्लीच्या विघ्नहर्ताचे ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत आगमन

ऑगस्ट 25, 2025
Nitesh Rane
संमिश्र वार्ता

देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द….नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला हा इशारा….

ऑगस्ट 25, 2025
rape
क्राईम डायरी

अल्पवयीन मुली असुरक्षीत…वेगवेगळ्या दोन घटनेत बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 25, 2025
Jitendra Awhad
संमिश्र वार्ता

अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती हनुमानजी…अनुराग ठाकुर यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

ऑगस्ट 25, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोहित पवार यांनी पुन्हा मंत्री संजय शिरसाटवर केला हा मोठा गंभीर आरोप….दिले १२ हजार पानांचे पुरावे

ऑगस्ट 25, 2025
प्रातिनिधीक फोटो
संमिश्र वार्ता

दहा वेळा पळून गेलेल्या विवाहित महिलेचा १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याचा प्रस्ताव….बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 25, 2025
Next Post
Untitled 52

अरे व्वा…आजारी मालकाला भेटण्यासाठी हत्ती गेला रुग्णालयात (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011