इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भिवंडीः निवडणूक रोखे म्हणजे जगातील सर्वात मोठे हप्ता वसुली रॅकेट असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भिवंडी येथे केला. देशाच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात मोदी यांचा हात असल्याचेही ते म्हणाले.
भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान भिवंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना राहुल यांनी ‘सीबीआय’, ‘ईडी’, प्राप्तिकर विभागाकडून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून ही वसुली करण्यात आली आहे. एखाद्या कंपनीवर तपास यंत्रणांकडून विभागाची कारवाई होते. त्यानंतर ती कंपनी निवडणूक रोखे खरेदी करते असे सांगत त्यांनी हे आरोप केले.
काही कंपन्यांना काम देऊन त्यातील हिस्सा निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसूल करण्यात आला आहे. काही कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, बोगद्यांची कामे देऊन त्याबदल्यात निवडणूक रोखे घ्यायला लावले. हा राष्ट्रद्रोह आहे, असा आरोप करून राहुल गांधी यांनी या प्रकरणात नितीन गडकरी यांना ‘क्लीन चिट’ दिली आणि मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ‘ईडी’, ‘सीबीआय’, प्राप्तिकर, निवडणूक आयोग या संस्थांना मोदी यांनी वसुलीच्या कामाला जुंपले आहे, असा आरोप करून ते म्हणाले, की यासाठी मोठ्या प्रमाणात शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला. या संस्था भाजप व आरएसएसच्या शस्त्र बनवल्या आहेत. परंतु भाजपची सत्ता गेल्यानंतर चौकशीनंतर अत्यंत कठोर कारवाई असेल.
काँग्रेससह विरोधी पक्षांनाही या रोख्यातून पैसे मिळाल्याकडे लक्ष वेधता राहुल म्हणाले, की यातील सर्वात जास्त पैसा भाजपला मिळालेला आहे. १०-२० टक्के पैसा विरोधी पक्षांना मिळाला असेल; परंतु काँग्रेसकडे मोठी कामे देण्यासाठी सत्ता नाही. तपास यंत्रणा आमच्या ताब्यात नाहीत. या सर्व संस्था पंतप्रधानांच्या नियंत्रणात आहेत, असे ते म्हणाले.
नि