येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील मेनरोड वरील पारख क्लॉथ या कपड्याच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास शॉट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याने दुकानात झोपलेल्या तीन कर्मचा-यांनी आरडा-ओरडा केल्याने परिसरातील नागरीकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
अग्निशाम दलाला याची माहिती देण्यात आल्या नंतर त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र कपड्यामुळे आग अधिकच पसरल्याने मनमाड,कोपरगाव येथून अग्निशामक दलाच्या गाड्या बोलविण्यात आले. सुमारे तीन तासाच्या प्रयत्ना नंतर आग विझविण्यात यश आले. मात्र या आगीमुळे दुकान मालकाचे लाखो रुपयाच नुकसान झाल आहे. +