पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक ग्राहक दिनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतला एक लाख देणगी मिळाली आहे. पुणे येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जागतिक ग्राहक दिनी आज सकाळी १० वाजता मला आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ वीणा दीक्षित यांनी फोन केला की त्यांच्या इमारतीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला काही डोनेशन ग्राहक पंचायत साठी द्यायचे आहे. तेव्हा तुम्ही पुण्याचे अध्यक्ष आहात तर कधी येऊ शकता?. त्याप्रमाणे मी दुपारी १२ पर्यंत त्यांचे घरी गेलो.
मी आणि सौ वीणा दीक्षित श्री रवींद्र जोशी आणि सौ देवयानी जोशी यांच्या घरी गेलो. गप्पा मारताना समजले की ते दोघेही पूर्वी मुंबई मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे काम करायचे स्वतः माजगाव डॉक यार्ड मध्ये उच्च पदावर काम करत होते आणि तेव्हा वितरणातून ग्राहक पंचायत चे काम करत असत.
भरपूर गप्पा मारल्या, पुण्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे काम त्यांना खूप आवडले असे त्यांनी आवर्जून सांगितले. मला तसेच सौ वीणा दीक्षित यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांनी एक लाख रुपयेचा चेक अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पुणे शाखेला दिला. त्यांनी आम्हास आवर्जून सांगितले की आपण तळागाळातील लोकांसाठी खूप काम केले पाहिजे, प्रत्येक वस्तीमध्ये, खेडेगावात व्यापारी मंडळींकडून ग्राहकांची होणारी पिळवणूक आपण थांबवली पाहिजे.
आज खरोखर जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशी एका जुन्या जाणत्या ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते ज्यांनी खूप चांगले काम केले आहे त्यांना भेटून धन्य झालो. स्वर्गीय नानांनी म्हणजे श्री बिंदू माधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायतचे जाळे आज सर्वत्र पसरले आहे आणि आता खेडेगावात पण अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे काम जोमाने सुरू आहे हे मी त्यांना सांगितले तसेच पुढील एखाद्या खेडेगावातील कार्यक्रमास आपणास घेऊन जाईन हे पण सांगितले.