मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना मालेगाव न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला. मालेगाव तालुका पोलिसात हिंदू देव देवतांच्या अवमान प्रकरणी गुन्हा दाखल होता. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी मालेगाव कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर मालेगाव अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस यू बघेले यांनी याप्रकरणी सुषमा अंधारे यांना अटक पूर्व जामीन मंजूर केला.
मालेगावच्या अमन परदेशीच्या तक्रारी वरून मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल होता.
एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी मुद्दाम हिन दर्जाचे अश्लील शब्द प्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला होता. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा त्यात आरोप होता.