नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत आपण दरवर्षी भारतीय परंपरे प्रमाणे करीत असतो . वर्ष २०१६ पासून दरवर्षी गोदातीरी गुढीपाडव्याच्या एक आठवडे आधीपासुनच संस्कृती जपणारे विविध सामूहिक कार्यक्रम घेण्यात येतात. कार्यक्रमाचे उद्देश्य हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा असतो. कार्यक्रमांचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता, जनजाती पुनरुत्थान इत्यादी प्रमाणे असतात. या वर्षी “स्वदेशी” हा या सर्व कार्यक्रमाचा विषय (थीम) असेल. यंदाचा हा कार्यक्रम राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ८ एप्रिल २०२४ दरम्यान, ‘पाडवा पटांगण (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी’ येथे आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमांचे स्वरूप पुढील प्रमाणे:
महारांगोळी: नाशिक शहराच्या सर्व भागातून व स्तरातून मोठ्या संखेने महिला एकत्र येऊन सुमारे ६००० चौरस फुट रांगोळी साकारतात . त्यासाठी त्यांचे रांगोळीचे कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाते.
महावादन: नाशिक नगरीतील सर्व ढोल पथक एकत्र येऊन महावादन हा सामुहिक ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम साकारत असतात. ढोलाच्या नादातून मोठ्या प्रमाणत सकरात्मक उर्जा तयार होत असते त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत हे सकारात्मक उर्जेने व्हावे हा उद्देश असतो. सदर कार्यक्रमामध्ये १५०० पेक्षा जास्त वादक सहभागी असतात. तरुण तरुणींमध्ये या कार्यक्रमाचे प्रचंड आकर्षण आहे व सहभाग ही लक्षणीय आहे .
अंतर्नाद: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या विविध वादयांचे वादक, गायक व नृत्य कलाकार एकत्र येऊन सामुहिकरित्या अंतर्नाद हा कार्यक्रम सादर करतात. या सर्व कार्यक्रमांना रसिक नाशिककर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहून आनंद घेतात.शस्त्र विद्या प्रदर्शन : छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन निमित्त शस्त्र प्रात्याक्षिके देखील सादर केली जातात.
स्वागत यात्रा: गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचवटी, काळाराम मंदिर परिसरातून पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली जाते. यात लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक व मर्दानी खेळांचे पथक असते.या सर्व कार्यक्रमांना मिळून एक ते सव्वा लाखांहून अधिक लोक उपस्थित असतात आणि भेट देतात. कार्यक्रम सर्वांसाठी खुला व निशुल्क असतो. तसेच या कार्यक्रमांमध्ये आबालवृद्ध देखील सामील होतात व आपली संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होते. १९४६ (२०२४) रोजी नववर्ष स्वागत समिती व नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे:
१. अंतर्नाद
फाल्गुन कृष्ण ११, शके १९४५ – शुक्रवार ५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अंतर्नाद पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित.
अंतर्नाद प्रमुख नाव – निनाद पंचाक्षरी
अंतर्नाद सहप्रमुख : केतकी चंद्रात्रे
प्रमुख पाहुणे – पंडित प्रसाद खापर्डे
पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित यामागचा उद्देश: स्वरांजली
सहभागी होणारे एकूण गुरुकुल (संस्था) – ७२
सहभागी होणारे एकूण विद्यार्थी (मुले/ मुली धरून) – १४००
काय सादर करणार त्याची थोडक्यात माहिती: हिंदुस्तानी कथ्थक, भरतनाट्यम, तबला, बासरी, शास्त्रीय गायन, सुगम संगीत ह्यांचा एकत्रित अविष्कार.
सादरीकरणासाठी लागणारा अंदाजे वेळ – १.३० तास
२. महावादन
फाल्गुन कृष्ण १२, शके १९४५ – शनिवार ६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महावादन क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांना समर्पित.
महावादन प्रमुख नाव – प्रितम प्रेमराज भामरे
प्रमुख पाहुणे – श्री. किसनराव जाधव (क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज)
किती पथकांचा सहभाग – 30 हुन अधिक पथके सहभागी असतील
कुठून कुठून पथक सहभागी झाले त्या गावांची / शहरांची / जिल्ह्यांची नावे – नाशिक शहरातील तसेच सिन्नर ग्रामीण मधील दिंडोरी, लासलगाव, सायखेडा, पालखेड.
काय सादर करणार (रचना / तालांची नावे) – यावर्षी अयोध्या रामजन्मभूमी श्री राम मंदिर स्थापना झालेली असून या वर्षी भीमरूपी तालासह पारंपरिक आवर्तन वादनात रंगत आणतील त्यासोबत ढोल ताशा ध्वजा सोबत बरची नृत्य सादरीकरण असेल
सादरीकरणाचा वेळ- ६ ते ९
३. महारांगोळी
फाल्गुन कृष्ण १३/१४, शके १९४५ – रविवार ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून महारांगोळी: तृणधान्य माध्यमातून स्थानिक अन्न याचे महत्त्व अधोरेखित करणारे.
रविवार ७/४/२०२४ ला महारांगोळी तृणधान्य माध्यमातून स्थानिक अन्न याचे महत्त्व अधोरेखित करणारे.
महारांगोळी प्रमुख नाव – सौ. आरती ऋषिकेश गरुड
महारांगोळी सह प्रमुख – सौ. सुजाता धर्मेंद्र कापुरे व सौ. मयुरी शुक्ला नवले
रचनाकार – निलेश देशपांडे
पहिला बिंदू (ठिपका) ठेवणारे मान्यवर प्रमुख पाहुणे (नाव आणि परिचय)- धान्य पिकवण्यापासून ते त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सामान्य महिला, आणि शुभदा जगदाळे.
रांगोळीची माहिती (विषय) – मिलेट्स, श्रीअन्न, तृणधान्य
हाच विषय निवडण्यामागचा उद्देश – मिलेट्स वर्ष
धान्य किती – 3000 किलो
रांगोळीचा आकार – 75 * 75 फूट
रांगोळीत वापरले जाणारे तृणधान्य (नावे आणि प्रमाण) – Pearl( बाजरी), Fingure( रागी/ नाचणी), Sorghum ( ज्वारी), Little millets ( सावा) ( कुटकी,काबू, पोन्नी), Proso ( वरई), Foxtail ( कांगणी/ राळा ), Barnyard( भगर), Brown top( सामा/ कोराळे), Kodo ( कोद्रा).
रांगोळी किती दिवस ठेवणार – 3
रांगोळीत वापरल्या जाणाऱ्या तृणधान्याचे पुढे काय करणार – निवडून, स्वच्छ प्रक्रिया करून मग ते गरजू लोकांपर्यंत, अनाथ, वृध्दाश्रम इथे याचे वाटप.
किती महिलांचा सहभाग – १००
रांगोळी काढण्यासाठी लागणारा अवधी(वेळ) – 3 तास
४. “वारसा” युद्ध कलेचे प्रात्यक्षिक
फाल्गुन अमावस्या, शके १९४५ – सोमवार ८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली “वारसा” युद्ध कलेचे प्रात्यक्षिक.
प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या संस्थेचे नाव व थोडक्यात माहिती – कोल्हापूर येथील सव्यसाची गुरुकुलम्, वेंगरुळ, गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी
सहभागी कलाकार – नाशिकमधील 40 विद्यार्थी आणि सव्यसाची गुरुकुलम् मधील सादरकर्ते
५. स्वागत यात्रा
चैत्र शु. प्रतिपदा शके १९४६, मंगळवार ९ एप्रिल २०२४ गुढी पाडवा : स्वागत यात्रा
यात्रेचा मार्ग १ – काळाराम मंदिर -नागचौक -हत्ती पूल -गजानन चौक -पाथरवट लेन -मालवीय चौक -पंचवटी कारंजा -मालेगाव स्तंभ-कपालेश्वर -पाडवा पटांगण .
यात्रेचा मार्ग २ – साईबाबा मंदिर -कलावती आई मंदिर- तळे नगर- गणपती मंदिर- क्रांती नगर- राजपाल कॉलोनी- मखमलाबाद नाका .
यात्रेचा मार्ग ३ – स्वामी समर्थ केंद्र – चंद्रमा हॉस्पिटल – प्रभात वंदन अपार्टमेंट – अवध सोसायटी – ड्रीम कास्टल – पॉवर हाऊस जिम- मधुबन कॉलनी रोड – मखमलाबाद नाका
यात्रेचा मार्ग ४ – खुटवडनगर स्वागतयात्रा १) पवननगर ते माऊली लॉन्स २) विखे पाटील शाळा, सोनल डेरी ते माउली लॉन्स ३) धन्वंतरी कॉलेज, वावरे नगर ते माऊली लॉन्स ४) वनश्री कॉलनी, सोनल डेरी ते माऊली लॉन्स मंगल कार्यालय, कामट वाडे, नाशिक.
यात्रेत सहभागी होणाऱ्या संस्था – महर्षी गौतम गोदावरी वेद प्रतिष्ठान, गोपीनाथ गौडीय मठ, एकल महिला ग्राम संघटन, भारतीय स्त्री शक्ती संस्था, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, स्वावलंबी भारत, गुरुवर्य किर्तीकुमार औरंगाबादकर संचलित नाशिक योग विद्या केंद्र
यात्रेतील चित्ररथ व त्यावरील संदेश – गुढीचा रथ त्या रथावर सरदार चौक मित्र मंडळाचा गणपती, भारत माता पालखी, गोपीनाथ गौडीय मठ यांचा चित्ररथ व नगर संकीर्तन, गोशाळेचा चित्ररथ
यात्रेत सादर होणारे कलाप्रकार – लेझीम पथक, तलवार पथक, लाठी काठी पथक, ढोल ताशा पथक, ध्वजपथक
तरी पाडवा पटांगण (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष शिवाजी बोन्दार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, सचिव जयेश क्षेमकल्याणी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९८८१४७५२७४.
आज रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस मंचावर उपस्थित समिती सदस्य –
शिवाजी बोंन्दार्डे – अध्यक्ष, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक
चंद्रशेखर जोशी – उपाध्यक्ष, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक
जयेश क्षेमकल्याणी – सचिव, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक
प्रफुल्ल संचेती – मार्गदर्शक, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक
राजेश दरगोडे – मार्गदर्शक, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक
सौ. आरती ऋषिकेश गरुड – महारांगोळी कार्यक्रम प्रमुख
प्रितम प्रेमराज भामरे – महावादन कार्यक्रम प्रमुख
निनाद पंचाक्षरी – अंतर्नाद कार्यक्रम प्रमुख
प्रसाद गर्भे – प्रसिद्धी प्रमुख