बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात मुतखड्यावर उपचार करणाऱ्या अद्यावत मशीनचे लोकार्पण

by Gautam Sancheti
मार्च 15, 2024 | 3:16 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240315 WA0278 2 e1710495935667


जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनेक उपकरण घेतली जे महाराष्ट्रात इतरत्र नाहीत. आता मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेले ‘स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ ही अद्यावत मशीनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिली. अशी अद्यावत मशीन उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही ती जळगाव मध्ये बसविण्यात आली असून कोणतीही वेदना होणार नाही अशी ही मशीन काही सेंकदात मुतखडा फोडते आणि तें लघवी वाटे विना अडथळा बाहेर पडते. फक्त एक पॅरासिटॉमॉल गोळी खाऊन रुग्ण घरी जाऊ शकतो असे तज्ञ डॉक्टरांनी आपल्याला सांगितले. आता मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी गोरगरीबाला हजारो रुपये मोजावे लागणार नाहीत. अशी सोय जळगाव मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे आपल्याला समाधान असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखविली.

जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ‘ ई. एस.डब्लु. एल. सेंटर ऑफ एक्सलन्स ‘ चे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, अरविंद देशमुख, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

या नव्या यंत्राद्वारे होणारी एक विना-शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. जी मूत्रमार्गाच्या काही भागांमध्ये मुतखडे फोडण्यासाठी शॉकवेव्ह वापरते. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हा किडनी स्टोनसाठी एक सामान्य उपचार आहे. कधीकधी या प्रक्रियेला स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी (Spark EM ESWL) म्हणतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी मुतखडे फोडण्यासाठी उच्च-उर्जा शॉक (उच्चदाब) लहरी वापरते. किडनी स्टोनचे छोटे तुकडे नंतर मूत्रमार्गात अधिक सहजतेने जाऊ शकतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी रुग्णाची वेदना कमी करण्यात मदत करु शकते. मूत्रपिंडातील (किडणी) मुतखडे काढून टाकण्यासाठी अधिक आक्रमक शस्त्रक्रिया टाळण्यात ते मदत करु शकते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव संस्थेमध्ये नवीनतम पिढीतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक शॉकवेव्ह एमिटर टेक्नॉलॉजी (Spark EM ESWL) सह ही सर्वात स्वस्त आणि जागतिक दर्जाचे उत्पादन आहे. जे मत्रपिंड आणि मुत्राशयातील मुतखडे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास मदत करते.स्पार्क हे जागतिक उत्पादन आहे आणि कंपनी जगभरातील 50+ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. सदर कंपनी ISO13485 आणि CE1984 प्रमाणक आणि गुणवत्ता व्यवस्थपन मान 9001:2008 सह उत्पादन प्रदान करते.अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर ट्रान्सफर करून कॅशियरने घातला ३५ लाखाला गंडा…नाशिकमधील घटना

Next Post

एसटी महामंडळाच्या ५००० डिझेल वाहनांचे एलएनजीमध्ये रूपांतरण…मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

ऑगस्ट 27, 2025
1 6 1068x1335 1 e1756283788606
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धा….प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

ऑगस्ट 27, 2025
court 1
संमिश्र वार्ता

गोदावरी नदीच्या पुनर्जीवन याचिकेत अवमान याचिका…दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

ऑगस्ट 27, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उध्दव ठाकरे…सहकुटुंब घेतले गणपतीचे दर्शन

ऑगस्ट 27, 2025
भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Next Post
unnamed 7 e1710501984368

एसटी महामंडळाच्या ५००० डिझेल वाहनांचे एलएनजीमध्ये रूपांतरण…मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011