इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूर : बँकेवर दरोडा टाकण्याच्या घटना आपण चित्रपट किंवा टीव्ही मालिकेमध्ये बघतो, परंतु प्रत्यक्षात बँकेवर दरोडा टाकल्याच्या घटना देखील अलीकडच्या काळात देशभरात घडल्या आहेत, बिहार व उत्तर प्रदेशात या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्या तरी आता महाराष्ट्रातही काही ठिकाणी असे प्रकार घडू लागले आहेत. सोलापूर मध्ये देखील एका बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून याची चर्चा आता सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.
१६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
सोलापूर शहरातील एक बँक लुटण्यासाठी मूळचे नेपाळ व आसाम येथील अट्टल दरोडेखोर सोलापुरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.पोलीसांनी नाकाबंदी करून उळेजवळ पाच जणांना वाहनांसह ताब्यात घेतले. त्या पाच जणांकडे चौकशी केली असता त्यांनी अन्य लोकाची नावे सांगितली. पोलिसानी पथके तैनात करून अन्य चोरांचा शोध घेत एकूण १३ जणांना अटक केली.
पोलीसांनी त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह ६ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. अटकेतील संशयित हे गॅस कटरच्या साहाय्याने बँक, सराफ दुकाने फोडण्यात सराईत आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयितांना १६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे आहे आरोपी
राज बहादुर कामी (वय २३, रा. अंबाली अंधेरी वेस्ट, मुंबई, दीपक बहादुर दिल्ली २३. रा. आंबोली, मुंबई. मुरसलीम ३४. झारखंड इनामूल शेख (१९, रा. पैगम ढोला झारखंड), सूरज नजीर उलहक (वय ३४, रा. पश्चिम बंगाला मोहम्मम लेख कमलुद्दीन शहाजूल (वय २३), द्वंदामुलक शेख (वय ४५), शिवसिंग देवल (वय ३४ टिकाराम गौरव कोली (वय ३४)विक्रमसिंह जमाई नेगी (वय ३४) भरसाउथ अर्का( ४५) या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.