नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर ट्रान्सफर करून कॅशियरने ३५ लाखाला गंडा घातला. सिक्युरिटी एजन्सीचा कारभार सांभाळणा-या कॅशिअरने ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित भिकचंद बोरा (रा.लक्ष्मीनगर,महाले पार्क) असे संशयित कॅशिअरचे नाव आहे. याबाबत गोविंदसिंग बलराजसिंग जादौन (रा. आनंदविहार कॉलनी,गंगापूररोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. जादौन यांची अरावली सिक्युरिटी आर्गनायझेशन नावाची सिक्युरिटी एजन्सी असून, या फर्ममध्ये संशयित कॅशिअर पदावर कार्यरत आहे.
११ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान संशयिताने फर्मच्या बँक खात्यातील ३५ लाख ११ रूपयांची रक्कम परस्पर आपल्या खात्यात वर्ग करून घेत हा अपहार केला. लेखापरिक्षणात ही बाब समोर आल्याने जादौन यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत.