इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यावर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. १७ वर्षांच्या मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना दोन फेब्रुवारी रोजी घडली. ही आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात येदियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.
सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा येदियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ (पोक्सो) च्या कलमाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईने पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर मध्यरात्री गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली.