इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर २ रुपयाने कमी केले आहे. देशभरात शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून हे दर लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा डिझेल – पेट्रोलचे दर २ रुपयांनी कमी करुन कोट्यवधी भारतीय परिवाराचे हित व सुविधांचे लक्ष ठेवले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात करून देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री @narendramodiजींनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कोट्यवधी भारतीय कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा देणे हेच त्यांचे ध्येय आहे.