इंडिया दर्पण वृत्तसेवा
सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्यातील चौदा कोटींचे काम पूर्ण झाले असून या पूर्ण कामांची बिले ठेकेदाराला अदा करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार नाशिक महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार, आमदार तसेच नगरसेवक यांनी केला असल्याचा आरोप माजी नगरसेविका किरण गामने व पती बाळ दराडे यांच्यासह मोरवाडीच्या ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या सर्व कामांची योग्य ती चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे व महापालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेविका किरण गामने दराडे म्हणाल्या की, या ठिकाणी लाखो रुपयांची झाडे लावण्यात आली आहे मागील वर्षभरापासून सर्वत्र झाडे जळून गेली आहे एकही झाड कामाचे राहीले नाही. लहान मुलांच्या खेळण्या तुटक्या फुटक्या अवस्थेत आहे. या ठिकाणी बसवण्यात आलेला फरशा, ग्रॅनाईट, मार्बल हे निखळून पडलेले आहे पथदीप बंद अवस्थेत आहे जॉगिंग ट्रॅक ची पूर्णतः दुरवस्था झालेली आहे या कामासाठी पुन्हा कोट्यावधी रुपये लागणार आहे मात्र स्थानिक आमदार व माजी नगरसेवक यांनी ठेकेदाराची पाठ राखण करत कोट्यावधी रुपये उकळण्याच्या बहनाने ठेकेदाराला दिले कसे ? स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल यावर पूर्ण लक्ष दिले.
सर्वसामान्य नागरिक जनतेच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी सेंट्रल पार्क सारखा प्रोजेक्ट उभारत आहे मात्र हा प्रोजेक्ट पूर्णतः निकृष्ट दर्जाचा आहे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ठेकेदाराचे बिल कसे निघतील यावर जास्त जोर देत आहे यात मोठ्या प्रमाणात टक्केवारी आमदार व एका नगरसेवकाने घेतली आहे यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेऊन अधिकाऱ्यांवर चौकशीची मागणी करणार तसेच पोलीस आयुक्तांना ही याचे निवेदन देणार आहे. हा मोठा भ्रष्टाचार जो कोणी बाहेर काढेल त्याला स्वतःची स्कोडा चार चाकी कार गिफ्ट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.