इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर दोन गट झाले. त्यानंतरही अजित पवार गट हा शरद पवारांचा फोटो वापरत असल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयानेच अजित पवार गटाची कानउघाडणी करत झापलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गट प्रचारासाठी शरद पवारांचा फोटो का वापरत आहे, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे.
सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सांगितले की, “तुम्ही आता वेगळा राजकीय पक्ष आहात. तुम्ही त्याच्यासोबत न राहणे निवडले आहे. मग त्यांचे (शरद पवार) चित्र का वापरायचे… आता स्वतःची ओळख घेऊन जा…”
मतदारांना आवाहन करण्यासाठी आपल्या नावाचा, छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवार गटाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला शनिवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.