इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा नाशिक जिल्ह्यात आज दुसरा दिवस आहे. या दुस-या दिवशी त्यांनी चांदवड येथील बाजार समिती आवारात शेतकरी मेळाव्याला संबोधीत केले. त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेत. शेतक-यांबाबत काँग्रेसचे धोरण त्यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थितीत होते.