इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा नाशिक जिल्ह्यात आज दुसरा दिवस आहे. या दुस-या दिवशी त्यांनी चांदवड येथील बाजार समिती आवारात शेतकरी मेळाव्याला संबोधीत केले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत, AICC मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री CWC सदस्य यशोमती ठाकूर, AICC सचिव आशिष दुआ, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, सरचिटणीस ब्रिजेश दत्त, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रवक्त्या हेमलता पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल, कम्युनिस्ट नेते माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व हजारो शेतकरी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे भारत जोडो न्याय यात्रा शेतकरी मेळाव्यास संबोधित करताना राहुलजी गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच्या ५ गॅरंटीची घोषणा केली. १. शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार MSP मिळेल असा कायदा केला जाईल. २. शेतकऱ्यांना कर्जमाफी. कर्जमाफीची रक्कम निर्धारित करण्यासाठी एक स्थायी कृषी कर्जमाफी आयोगाची स्थापना करण्यात येईल. ३. सध्याच्या पिक विमा योजनेचा फायदा केवळ कंपन्यांना होतो, शेतकऱ्यांना नाही. काँग्रेस सत्तेत आल्यावर पिक विमा योजनेची पुनर्रचना केली जाईल. ४. शेतकऱ्यांना जीएसटीतून वगळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. कृषीक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना करमुक्त करण्यासाठी जीएसटीमध्ये सुधारणा केली जाईल. ५. आयात-निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घेतली.
या शेतकरी मेळाव्याव्या. ही सभा आपण या लिंकमध्ये बघा….
https://www.facebook.com/share/v/4sgkXcVDNBNtGAug/?mibextid=qi2Omg