नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव येथील जिल्हा उद्योग केंद्र येथे दुध व्यवसायासाठी लागणाऱ्या म्हशी खरेदीसाठीचे कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर ते मंजुर करण्यासाठी एका खासगी महिलेने १० हजार रुपयाची लाच घेतली. संबधित अधिकारी यांना देण्याकरिता पांचासमक्ष ३० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हफ्ता १० हजार रुपये लाच स्विकारली. या लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे जिल्हा उद्योग केंद्र जळगाव येथे दुध व्यवसायासाठी लागणाऱ्या म्हशी खरेदीसाठीचे कर्ज प्रकरण दाखल करण्यास गेले असता तेथे तक्रारदार यांना वरील आरोपी खाजगी महिला यांनी भेटून जिल्हा उद्योग केंद्र येथील तक्रारदार यांचे प्रकरणावर कार्यवाही करणारे अधिकारी यांचेवर त्यांचा प्रभाव असल्याचे सांगून संबधित अधिकारी यांना देण्याकरिता पांचासमक्ष ३० हजार रूपये लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हफ्ता १० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. सदर लाचेची रक्कम १० हजार रुपये आरोपी खाजगी महिला यांनी स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – ला.प्र.वि. धुळे
*तक्रारदार-* पुरुष, 32 वर्ष.
आरोपी – विदया परेश शाह, वय-38 वर्ष, (खाजगी महिला)
*लाचेची मागणी- 30,000/- रुपये दिनांक 12/03/2024
*लाच स्वीकारली -10,000 /- रुपये लाचेचा पहिला हफ्ता दिनांक 13/03/2024
*लाचेचे कारण -यातील तक्रारदार हे जिल्हा उद्योग केंद्र जळगाव येथे दुध व्यवसायासाठी लागणाऱ्या म्हशी खरेदीसाठीचे कर्ज प्रकरण दाखल करण्यास गेले असता तेथे तक्रारदार यांना वरील आरोपी खाजगी महिला यांनी भेटून जिल्हा उद्योग केंद्र येथील तक्रारदार यांचे प्रकरणावर कार्यवाही करणारे अधिकारी यांचेवर त्यांचा प्रभाव असल्याचे सांगून संबधित अधिकारी यांना देण्याकरिता पांचासमक्ष 30,000/- रूपये लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हफ्ता 10,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. सदर लाचेची रक्कम 10,000/- रुपये आरोपी खाजगी महिला यांनी स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*पर्यवेक्षण अधिकारी – मा.श्री.अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा अधिकारी – हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
सापळा पथक-पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो.ना. संतोष पावरा, पो.शि.मकरंद पाटील, प्रशांत बागुल,रामदास बारेला, प्रविण पाटील,सुधीर मोरे, जगदीश मोरे.