इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून त्यात ७२ जणांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचे नाव घोषित केले आहे. पण, या यादीत पाच विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यात दोन खासदारांच्या घरातल्याला संधी दिली आहे. तर तीन खासदारांना मात्र उमेदवारी नाकारली आहे.
बीडमधून प्रीतम मुंडे, जळगावमधून उन्मेष पाटील, मुंबईतून गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, अकोल्यातून संजय धोत्रे यांना डच्चु देण्यात आले. भाजपने प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे, तर संजय धोत्रे एेवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देऊन घरातच संधी दिली आहे. जळगावमध्ये उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता पाटील, गोपाळ शेट्टी यांच्या जागी मुंबई उत्तर मतदारसंघात पियूष गोयल, मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून मनोज कोटक यांच्या मतदार संघात मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली.
भाजपने जाहीर केलेल्या या यादीतर आज नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिंडोरीमधून डॅा. भारती पवार, जालन्यातू रावसाहेब दानवे, भिंवडीतून कपिल पाटील,चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळे मतदारसंघातून सुभाष भामेर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अकोला मतदारसंघातून अनूप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे. वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांना संधी देण्यात आली आहे.
हे आहे उमेदवार
नागपूर – नितीन गडकरी, दिंडोरी – भारती पवार, उत्तर मुंबई – पियूष गोयल, बीड – पंकजा मुंडे, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार , नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर ,जालना – रावसाहेब दानवे, भिंवडी – कपिल पाटील, मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा, पुणे – मुरलीधर मोहोळ, अहमदनगर – सुजय विखे पाटील, लातूर – सुधाकर श्रृंगारे, माढा – रणजितसिंह निंबाळकर, सांगली – संजय काका पाटील