नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यात स्थानिक भाषांमध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध भारतीय भाषांमध्ये ५२ लघुपुस्तिका दाखल केल्या आहेत. हा उपक्रम महाराष्ट्राच्या स्थानिक भाषेच्या प्राथमिकतेपर्यंत विस्तारला गेला आहे. या प्राथमिक अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश वाचन आणि लेखनात भाषिक प्राविण्य विकसीत करण्याच्या पलीकडे असून ते शिक्षणाच्या प्रारंभिक टप्प्यात विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि गंभीर विचार विकसीत करण्याचा देखील प्रयत्न करतात. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते अलीकडेच या लघुपुस्तिकांचे अनावरण करण्यात आले.
खास महाराष्ट्रासाठी खानदेशी भाषेसाठी प्रायमर म्हणजे प्राथमिक स्वरुपातील लघुपुस्तिका विकसीत करण्यात आल्या आहेत. शिक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार NCERT ने आदिवासी समुदायांद्वारे बोलल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश असलेल्या १७ राज्यांमधील ५२ स्थानिक भाषांमध्ये हे प्रायमर तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी बोलताना प्रधान यांनी २०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) भारतीय भाषांमध्ये शिक्षणावर विशेष भर देण्यावर भर दिला. “एनईपी २०२० मध्ये भारतीय भाषांमधील शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. स्थानिक भाषेत वाचन केल्याने मुलांना एखादा विषय झटपट स्पष्ट होईल. सरकारचा हा उपक्रम भविष्यात शिक्षण क्षेत्रात गेमचेंजर ठरेल”.
मंत्रालयाच्या वतीने भारतीय भाषांमध्ये ५२ प्राथमिक अभ्यासक्रमांचा परिचय करून दिल्याने, विशेषतः विद्यार्थ्यांना बालपणीच्या शैक्षणिक तयारीदरम्यान, तरुण विद्यार्थ्यांचा एक परिवर्तनशील विकास झाला आहे. हा उपक्रम त्यांच्या मातृभाषा आणि स्थानिक भाषेतील शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करतो. तसेच तरुण मनांसाठी एक प्रेरणादायी प्रवासाचा श्रीगणेशा करतो. याचा परिणाम सखोल समज, आजीवन शिक्षणाची बांधिलकी, स्वदेशी संस्कृतीशी सुधारीत परिचय आणि संबंध; त्याचप्रमाणे जीवनाच्या विविध क्षेत्रातील मोठे शैक्षणिक यश आणि कामगिरी अपेक्षित आहे.