इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे प्रत्येक पक्ष आपली जोरदार तयारी करत आहे. त्यात राज्यात महायुती व महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्यामुळे यातील घटक पक्ष किती जागा लढणार यावर नेहमी चर्चा होते. पण, आता महायुतीचा फॅार्म्युला ठरला असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यात राज्यातील ४८ जागांपैकी भाजप ३०, शिवसेना शिंदे गट ११ तर अजित पवार गट ७ जागा लढणार असल्याचे ठरल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचा तिढा सुटल्यामुळे आता हा नवा फॅार्म्युला तयार झाला आहे. बैठका व भेटीगाठी झाल्यानंतर हे जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा झाल्यानंतर महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर पहिले मुंबईत तर दिल्लीत बैठक झाली. पण, या दोन्ही बैठकीत तिढा सुटला नाही. त्यानंतर आता पुन्हा चर्चेने हा तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे. आज किंवा उद्या यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाने १३ जागांची मागणी केली होती. पण, त्यांना २ जागा कमी देऊन त्यांचे समाधान केले जाणार आहे. राष्ट्रवादीने नऊ जागेची मागणी केली होती. पण, त्यांना ७ जागा दिल्या जाणार आहे. त्यात सातारा, रायगड, परभणी, बारामती, गडचिरोली, धाराशिव व शिरुर हे मतदार संघ सोडले जाणार आहे.