इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांनी माहिती निवडणूक आयोगाला सुपूर्द केली. अगोदर सहा मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टाने वेळ दिला होता. पण, स्टेट बँकेने मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर सोमवारी सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला झटका देत २४ तासात निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्टेट बँकेने ही माहिती मंगळवारी दिली.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तीच्या घटपीठाने सुनावणीमध्ये स्टेंट बँकेचा मुदवाढीचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर १२ मार्चपर्यंत निवडणूक रोखे तपशील सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर स्टेट बँकेने तातडीने ही माहिती दिली. आता १५ मार्चच्या सायंकाळापर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या वेबसाईटवर सादर करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाला १५ मार्चपर्यंत त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर कोणी कोणत्या पक्षाला किती देणगी दिली हे जाहीर करावे लागणार आहे.