नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याच्या बांधिलकीला नेत्यांनी दुजोरा दिला. आराखडा 2030 अंतर्गत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आदींसह विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
त्यांनी परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने केलेल्या प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचार विनिमय केला. उभय नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले आणि होळीच्या आगामी सणानिमित्त परस्परांना शुभेच्छा दिल्या.