मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रशासनिक सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या सुरु असलेल्या विशेष अभियान ३.० अंतर्गत, मुंबई विमानतळ सीमा शुल्क आयुक्तालय, मुंबई सीमा शुल्क क्षेत्र III ने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर सीएसएमआय विमानतळावर प्रवाशांकडून जप्त केलेल्या अवैधरित्या आयात झालेल्या सिगरेट, तंबाखू, इ सिगरेट नष्ट केल्या आहेत.
मुंबई विमानतळ सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात या प्रतिबंधित सिगारेट जप्त केल्या होत्या. सीमाशुल्क कायदा, १९६२ आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण कायदा, २००३ (सीओटीपीए, २००३) च्या नियमनाच्या तरतुदींचे उल्लंघन करून भारतात या सिगरेट्सची तस्करी झाली होती.
मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या ३७०० किलो सिगरेट आणि इ सिगरेट १२ ऑक्टोंबरला नष्ट केल्या. याची बाजारभावाने किंमत २ कोटी ८० लाख रुपयाची होती. तळोजा इथल्या मुंबई घनकचरा व्यवस्थापन लिमिटेड येथे कचरा जाळण्याच्या सुविधा केन्द्रात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने (एमपीसीबी) ही कारवाई केली. घातक आणि इतर कचरा (एम अँड टीएम) नियम २०२६ अंतर्गत या प्रतिबंधित सिगारेट नष्ट करण्यात आल्या.