इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ४३ उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या या दुस-या यादीत गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, दिव – दमण आणि राजस्थानच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या ४३ उमेदवारांमध्ये ७ जनरल, १३ ओबीसी, १० एससी, ९ एसटी आणि १ मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे. काँग्रेसने राजस्थानच्या २५ जागांपैकी १० जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसने मध्यप्रदेशातील १० जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.