नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- म्हसरूळ येथे खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात शिरलेल्या तीन भामट्या महिलांनी सुमारे ७५ हजार रूपये किमतीचे चांदीचे पैंजन चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस दप्तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय भाऊ महाले (रा.धात्रकफाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाले यांचे गुप्ता स्विट समोरील सुकमल आर्केड या इमारतीत महाले ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात गेल्या बुधवारी (दि.६) दुपारच्या तीन महिला खरेदीसाठी आल्या होत्या.
अलंकार खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या भामट्या महिलांनी महाले यांचे लक्ष नसल्याची संधी साधत सुमारे ७५ हजार रूपये किमतीच्या चांदीच्या पैंजन चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.