नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील वाढणे फार्म भागात भरधाव अज्ञात आयशर मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
महमद कयामुद्दीन साई (३४ रा.अजमेरनगर,केवलपार्क अंबडलिंकरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. महमद साई हा गेल्या शुक्रवारी (दि.८) सकाळच्या सुमारास निमाणी कडून दिंडोरीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात आयशर मालट्रकने दुचाकीस धडक दिली होती.
या अपघातात साई गंभीर जखमी झाला होता. कुटुंबियांनी त्यास आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार राजू जगताप करीत आहेत.