पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा निफाडला १३ मार्च अर्थात बुधवारा होणारा दौरा आहे. हा दौरा चर्चेचा ठरणार असतांना शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वीच निफाड चौफुलीवर ज्यांनी द्रोह केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये, अशा आशयाचे अन बंडखोरांना इशारा देणारे फलक झळकल्याने निफाडच्या त्या बॅनरने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर निफाड मतदार संघाचे आमदार दिलीप बनकर मतदार संघाच्या विकासासाठी अजित पवार गटात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्हाचा निकाल नुकताच अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचा निफाड दौरा होत आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली असतांना दुसरीकडे त्या दौऱ्या आधीच निफाड चौफुलीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष भूषण शिंदे यांनी ज्यांनी द्रोह केला. त्यांनी माझा फोटो वापरू नये असे बंडखोरांना इशारा देणारे फलक लावल्याने त्या बॅनरबाजीमुळे निफाड मतदार संघातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
शरद पवार यांच्या जंगी स्वागताची तयारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा निफाड मतदार संघात होणारा दौरा चर्चेचा विषय ठरणार आहे. अजित पवार गटात निफाडचे आमदार दिलीप बनकर सामील झाले असताना दुसरीकडे हीच जमेची बाजू सारून निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी शरद पवार यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. शिवाय सबंध निफाड तालुक्यात त्यांनी पवार यांच्या जंगी स्वागताची केलेली बॅनरबाजी तालुक्यातचर्चेचा विषय ठरत आहे.