इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये भाजपाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळाने सुध्दा राजीनामा दिला आहे. भाजपा आणि जननायक जनता पार्टी (JJP) यांची आघाडी तुटल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरुन ही आघाडी तुटल्याच बोलले जात आहे.
दरम्यान मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. याअगोदर त्यांनी जेजेपीबरोबर शपथ घेतली होती. पण, आता ते अपक्ष आमदारांबरोबर मुख्यमंत्रीपदाची नव्याने शपथ घेणार आहे. खट्टर यांच्याशिवाय संजय भाटीया यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.
आज दुपारी १ वाजता नव्या सरकारचा शपथविधी होईल. जेजेपीचे ४ ते ५ आमदार फुटून भाजपामध्ये सहभागी होऊ शकतात. हरियाणात चंदीगड येथील निवासस्थानी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची बैठक सुरु आहे. आघाडी तुटल्यानंतर भाजपा हरियाणामध्ये अपक्ष आमदारांच्या समर्थनाने आरामात सरकार बनवू शकते. जेजेपीच्या १० आमदारांपैकी ५ चंडीगड येथे पोहोचले आहेत. भाजपाला जेजेपीची आवश्यकता नाहीय. त्यांच्याशिवाय ते सरकार स्थापन करु शकतात अशी येथील राजकीय परिस्थिती आहे.