नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकसाठी गुड न्यूज मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कामाबाबत आता सकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहे. विद्यापीठाने नाशिक उपकेंद्रासाठी १३ कोटींचा निधी मंज़ूर केला आहे. त्याचबरोबर नग़र उपकेंद्रासाठी ९ कोटिंचा निधी मंजूर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मागणी होती. पण, निधी नाही म्हणून हात झटकले जात होते.
या निधी बरोबरच नाशिकला परीक्षा विभाग़ कामकाज सुरू करण्यासाठी २ अधिकारी नियुक्त करणार आहे. SPPU एज्यूटेक कंपनीचेही २ कर्मचारी नाशिक उपकेंद्रात नियुक्त होणार. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे दाखले ऑनलाइन आणि नाशिकला मिळणार आहे.
हे सर्व निर्णय व्यवस्थापन परिषद आणि बजेट कमिटीत झाले आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांच्या प्रयत्नना यश मिळाले आहे.
नाशिक उपकेंद्र सक्षम होणार
नाशिक उपकेंद्र सक्षम करुन जिल्हयातील दोन लाख विद्यार्थी यांना दिलासा मिळणार आहे. २०० संस्था, हज़ारो प्राध्यापकांना सोयीचे होणार आहे. झारितल्या शुक्राचार्यानी कितीही अड़ळले आणले तरी उपकेंद्र कँम्पस भव्य दिव्य, विद्यार्थी हिताचे सेंटर बनवल्यशिवाय आम्ही थांबणार नाही. नाशिकचे सर्व सीनेट सदस्य, विद्यार्थी संघटना, राजकीय नेते, पालकमंत्री, प्रशासन, प्रसिध्दी माध्यम, उद्योग क्षेत्र यांचे याकामी पाठबळ मिळाले आहें.
सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ