नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामाचे पैसे बँक खात्यात जमा झाले म्हणून त्यामोबदल्यात ४८०० रुपयाची लाच घेतांना कळवण येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे प्रभाग समन्वयक देविदास सयाजी चव्हाण हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. त्यांच्यावर अभोणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे तीन महिन्याचे १६ हजार ८०० रुपये तक्रादार यांचे बँक खात्यावर जमा झाले. त्याचे मोबदल्यात स्वतःसाठी व त्यांचे वरिष्ठ साठी यांचेसाठी १६ हजार ८०० रुपये बँक खात्यावर जमा केले म्हणून ६ मार्च रोजी कार्यालयात लाचेची मागणी करून ११ मार्च रोजी ग्रामपंचायत कनाशी भक्त निवास पाच पांडव मंदिर हॉल येथे ४ हजार ८०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अभोणा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- महिला वय 31
*आलोसे- देविदास सयाजी चव्हाण, प्रभाग समन्वयक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान कळवण जि नाशिक
*लाचेची मागणी- 4,800/- रुपये
*लाच स्विकारली- 4,800/ रुपये
*हस्तगत रक्कम- 4,800/-रुपये
*लाचेची मागणी – दि.06/03/2024
*लाच स्विकारली – दि.11/03/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे तीन महिन्याचे 16800/रुपये तक्रादार यांचे बँक खात्यावर जमा झाले त्याचे मोबदल्यात स्वतःसाठी व त्यांचे वरिष्ठ साठी यांचेसाठी 16800/-रुपये बँक खात्यावर जमा केले म्हणून दि 6/03/2024 रोजी कार्यालयात लाचेची मागणी करून दि 11/03/2024 रोजी ग्रामपंचायत कनाशी भक्त निवास पाच पांडव मंदिर हॉल येथे 4800/ रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अभोणा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- सापळा अधिकारी – श्रीमती वैशाली पाटील पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक – पोहवा /शरद हेंबाडे, महिला पोलीस अंमलदार शीतल सूर्यवंशी