मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नही असे म्हणत काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा सोशल मीडियातून केला आहे.
त्यांनी हा दावा करतांना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! या दाव्यानंतर मात्र राजकारण खळबळ निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपात भाजपने अजित पवार गटाला अवघ्या ४ जागा देणार असल्याची चर्चा असल्यामुळे राष्ट्रवादीत अगोदरच नाराजीचा सूर आहे. त्यात लोंढे यांनी हा दावा केल्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया आल्यानंतर एका नेटक-याने आधी तुमच्या पक्षाला लागलेली गळती अंतर्गत कलह सगळं थांबवा तुमचं असं झालं आहे म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे. जरा स्वतःच्या पक्षाचा विचार करा काय अवस्था आहे तुमच्या पक्षाची मग दुसऱ्याच्या पक्षाची मोज माप काढा तुमचा सुपडा साफ होणार हे नाही का सांगितल सूत्रांनी असे म्हटले आहे.