इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेस निवडणूक रोख्यांनी माहिती देण्यासाठी सहा मार्चपर्यंत वेळ देण्यात आला होता. पण, स्टेट बँकेने मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्याची सुनावणी आज झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला झटका देत उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तीच्या घटपीठाने आज झालेल्या सुनावणीमध्ये स्टेंट बँकेचा अर्ज फेटाळून लावला. आता १२ मार्चपर्यंत निवडणूक रोखे तपशील सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या सुनावणीत आतापर्यंत तुम्ही काय केले असा सवालही विचारत न्यायालयाने बँकेला फटकारले. त्याचप्रमाणे १५ मार्चच्या सायंकाळापर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या वेबसाईटवर सादर करावी असे आदेशची सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाला १५ मार्चपर्यंत त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर कोणी कोणत्या पक्षाला किती देणगी दिली हे जाहीर करावे लागेल.