नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या वाढोली या गावात महाले कुटुंबियांतील अंकुश महाले यांच्याबरोबर मनाली देवरे यांनी संवाद साधला आहे. नाशिकपासून २५ किमी अंतरावर असलेल्या हे गाव प्रसिध्द प्रती केदारनाथ मंदिराजवळ आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या ठिकाणी महाले कुटुंबियांची शेती आहे. या शेतीत ते अनेक प्रयोग करतात. त्याबरोबरच ते गोपालक व गोवंशप्रेमीं आहे. गायींचे संवर्धन करण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. आज त्यांच्याकडे तब्बल ४५ गायीं आहेत. त्यामुळे गोवंश संवर्धनाबाबतही त्यांच्याकडून आपण माहिती त्यांनी या मुलाखतीतल दिली आहे.
या मुलाखतील त्यांनी शेतीविषयी व गावाविषयीची माहिती, गोसंवर्धनाबाबतची माहिती, देशी गायी व विदेशी गायीममधील फरक, पावसाळ्यात सर्व गोपालक गायींना घेऊन डोंगरावर जातात तो थरारक अनुभव, प्रती केदारनाथ मंदिराबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे. तर चला बघू या अंकुश महाले यांची विशेष मुलाखत….