नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेची निवडणूक १४ मार्चला जाहीर होणार असल्याची चर्चा होती. पण, आता ही निवडणूक आयोगाच्या दोन सदस्य निवडीनंतर होणार असल्याचे बोलले जात आहे. या दोन सदस्यांच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ तारखेला बैठक बोलवली आहे. त्यामुळे आता १८ तारखेनंतरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांची निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात १५ तारखेला मोदी यांनी बैठक बोलवली आहे. विरोदी पक्षनेते अधीररंजन चौधरी हे या समितीचे सदस्य आहेत. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करणार आहे. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव यांचा आहे.
केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निवडणूक आयुक्तांसाठी दोन नावे दिल्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर शिक्तामोर्तब करतील.