इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पुन्हा सोमवारी महायुतीची बैठक होणार आहे. याअगोदर पहाटेपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. पण, या बैठकीत भाजप ३१ ते ३२, शिंदे गट दहा ते बारा तर अजित पवार गट तीन-चार जागा लढवण्याचे निश्चित झाले. पण, त्यावर शिंदे गट व अजित पवार गट समाधानी नसल्यामुळे आता पुन्हा ही बैठक सोमवारी होणार आहे.
अगोदर झालेल्या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८० टक्के पूर्ण झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता २० टक्के जागेवर या बैठकीत समाधान होते की नाराजी कायम रहाते हे महत्त्वाचे ठरणार आहे..
सोमवारच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटातील प्रफुल्ल पटेल सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.