पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी नाशिक कॅम्पसची पाहणी आज केली. आले ते शिवनाई शिवारातील बांधकाम स्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते. नाशिकची भव्य नियोजित इमारत, कॅम्पसची प्रगती पाहून त्यांना आनंद झाला.
दोन महिन्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी लेटर बॉम्ब टाकत कुलगुरु आणि प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर नाशिकच्या विदयार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर सर्वच कामे हळूहळू मार्गी लागले. त्यामुळे कुलगुरुंचा हा दौरा चर्चेचा ठरला.
त्यांच्या या दिवसभर नाशिकमध्ये असलेल्या दौ-याबाबात एकाने प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, कुलगुरू सीएसआरसाठी उद्योजकांना, पत्रकारांना भेटले असते, MBA कॉलेजला गेले असते तर अधिक बरे झाले असते. असो. कतार, फ्लोरिडा, कझाकिस्तान, दुबई सह विदेशात कॅम्पस उभारण्याचे प्रयत्न करणाऱ्या आणि त्यासाठी विद्यापीठच्या पैशाने विदेश दौरे करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला अखेर नाशिक,नगर कॅम्पसचा कळवळा आला हे ही काही कमी नाही.
या दौ-याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, अखेर कुलगुरू नाशिक कॅम्पसची पाहणी करण्यासाठी आले याचा आनंद आहे. ते शिवनाई शिवारातील बांधकाम स्थळाची पाहणी करण्यासाठी आल्यावर त्यांचे स्वागत केले. सर्व माहिती दिली. नाशिकचे भव्य नियोजित इमारत, कॅम्पसची प्रगती पाहून त्यांना आनंद झाला. बाकी त्यांच्या दौ-याबद्दल मला कल्पना नाही.
नाशिक उपकेंद्र बांधकाम, प्रस्तावित SOP, प्राध्यापक पदोन्नती, CAS प्राध्यापक भरती असे अनेक विषय प्रलंबित होते. त्यावर कुलगुरुंनी नंतर सकारात्मक निर्णय घेतले. त्यानंतर हा दौरा असल्यामुळे तो चर्चेत आला. त्यात त्यांनी फक्त पाहणी केली. इतर सर्वांना भेटले असते तर त्याचा सर्वांना आनंद झाला असता..