नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील दिव्या अॅड लॅब सिनेमागृहाच्या पार्किँगमध्ये जुगार खेळणा-या चार जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य पोलीसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार उध्दव मोरे (रा.अष्टविनायक चौक,सावतानगर),दौलत राधाकिसन जाधव (रा.साईबाबानगर सिडको),देवेंद्र सिताराम साळुंके (रा.बजरंग चौक,सावतानगर) व प्रविण छबू तांबडे (रा.मोती चौक,श्रीरामनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत..दिव्या अॅड लॅब सिनेमागृहाच्या पार्किंगमध्ये काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार शुक्रवारी (दि.८) सायंकाळी पोलीसांनी छापा टाकला असता संशयित आर्थिक फायद्यासाठी मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून जुगाराच्या साहित्यासह रोकड असा सुमारे ७३० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
वृध्देच्या गळय़ातील सोन्याची पोत चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजीपाला बाजारातील गर्दीची संधी साधत भामट्यांनी वृध्देच्या गळय़ातील सोन्याची पोत हातोहात लांबविल्याची घटना सिडकोतील शिवाजीचौकात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला सुर्यकांत सोनवणे (७४ रा.तुळजा भवानी मंदिराजवळ,सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे या सोमवारी (दि.११) सकाळच्या सुमारास शिवाजी चौकात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. गर्दीत त्या भाजीपाला खरेदी करीत असांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.