नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शंकरनगर भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेची वाट अडवित दोघांनी शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची घटना घडली. या घटनेत एकाने महिलेचा विनयभंग केला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुज्जफर उर्फ मज्जू निसार बेग व जायदा निसार बेग (रा. तिग्रानिया कंपनी जवळ शंकरनगर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिला शुक्रवारी (दि.८) सकाळच्या सुमारास आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना तिग्रानिया कंपनीजवळ संशयित मज्जू व जायदा यांनी तिची वाट अडविली.
यावेळी संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. याप्रसंगी मज्जू याने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.