इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर राज्याच्या जागा वाटपाची पहाटेपर्यंत बैठक झाल्यानंतर त्याबाबत काय निर्णय झाला हे पुढे आले नाही. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेसाठी भाजपने जागावाटपाचे ८० टक्के काम पूर्ण केले असून चर्चा करून लवकरच सर्व जागावाटप जाहीर करणार असल्याचे नागपूर येथे पत्रकारांशो बोलतांना सांगितले.
यावेळी मनसेबाबत बोलतांना ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंदुत्वाविषयीची व्यापक भूमिका ही भाजपच्या विचारांशी विसंगत नसून एक सारखीच आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान जागाबाटबाबत पुन्हा सोमवारी बैठक होणार असल्याची चर्चा आहे. आजच्या बैठकीत शिंदे गट १० व अजित पवार गट ४ जागा तर भाजप ३४ जागावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचेही बोलले जात आहे.