नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगांव येथे रायपूर गावातील ग्रामपंचायतीमधील सदस्यांचा तीन अपत्य बाबतचा अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी शाश्वती देत २० हजाराची लाच घेतल्याप्रकरणात दोन जिल्हाधिकाकारी कार्यालयातील ग्रामपंचायात विभागाचे दोन कर्मचारी एसबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की,तक्रारदार हे ग्रामपंचायत निवडणुक २०२१ मध्ये निवडून आले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तीन अपत्य बाबत यांनी तक्रारी अर्ज केला होता. सदरचे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील आलोसे क्र.1 यांचेकडे पेडींग होते. त्यानंतर तक्रारदार हे आलोसे क्र 1 यांना त्यांचे कार्यालयात भेटले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना सांगितले की तुमचा तिन अपत्य बाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो
त्यासाठी मला 30000/- रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.09/03/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता आलोसे क्र 1 यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केली. त्यानंतर आज रोजी आलोसे वानखेडे लिपीक यांनी सांगितल्याने आरोपी क्र 2 यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात 20000/- रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर जिल्हापेठ पोलीस स्टेशन ता. जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
*यशस्वी सापळा कारवाई…
*युनिट – जळगाव.
*तक्रारदार- पुरुष,वय- 50 रा. रायपूर ता. जि.जळगांव
*आलोसे- 1. महेश रमेशराव वानखेडे, वय 30 , व्यवसाय नोकरी, लिपीक ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव जि.जळगांव, मुळ रा. नेर ता. नेर जि. यवतमाळ
- समाधान लोटन पवार वय 35 वर्ष , व्यवसाय नोकरी, लिपीक, ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव जि. जळगांव रा. लालबाग कॉलणी पारोळा ता. पारोळा जि. जळगांव
*लाचेची मागणी- 30,000/-
*लाच स्विकारली- 20,000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 20,000/-रुपये
*लाचेची मागणी – दि.09/03/2024
*लाच स्विकारली – दि.09/03/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे ग्रामपंचायत निवडणुक 2021 मध्ये निवडुन आले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तिन अपत्य बाबत यांनी तक्रारी अर्ज केला होता. सदरचे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील आलोसे क्र.1 यांचेकडे पेडींग होते. त्यानंतर तक्रारदार हे आलोसे क्र 1 यांना त्यांचे कार्यालयात भेटले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना सांगितले कि तुमचा तिन अपत्य बाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो
त्यासाठी मला 30000/- रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.09/03/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता आलोसे क्र 1 यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केली. त्यानंतर आज रोजी आलोसे वानखेडे लिपीक यांनी सांगितल्याने आरोपी क्र 2 यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात 20000/- रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर जिल्हापेठ पोलीस स्टेशन ता. जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा पर्यवेक्षक अधिकारी – श्री.सुहास देशमुख,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
▶️ *सापळा व तपास अधिकारी
एन. एन. जाधव,पोलिस
निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
▶️ *सापळा पथक*
सफौ दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे , पोकॉ अमोल सुर्यवंशी