नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चांदशी भागात आंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या १८ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमोल दादासाहेब वाघ (रा.शिवनगर,आनंदवली) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाघ गुरूवारी (दि.७) अन्य तीन मित्रांसमवेत आंघोळीसाठी गोदावरी नदीवरील चांदशी पुल भागात गेला होता. धबधबा भागात आंघोळ करून तीन मित्र पाण्याबाहेर पडले मात्र अमोल वाघ बेपत्ता झाला होता. स्थानिकांच्या मदतीने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो मिळून आला नाही.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला. याबाबत करण वाघ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार झिरवाळ करीत आहेत.