मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन तंत्रज्ञान संचालित गतीशीलतेचा अनुभव देण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या किया इंडियाने ४००,००० कनेक्टेड कार्सची विक्री करून आणखी एक मैलाचा खडक ओलांडला आहे. किया इंडियाच्या एकंदर देशांतर्गत विक्रीमध्ये कनेक्टेड कार्स प्रकारांचे योगदान ४४% पेक्षा जास्त आहे, जो या उद्योगातील एका उत्तम केस-स्टडीचा नमूना आहे. किया इंडियाचे कनेक्टेड कार प्रकार ३०.९% सीएजीआर दराने वाढत आहेत. ही वाढ २०३२ पर्यंत अंदाजित १८% च्या जागतिक दरापेक्षा जास्त आहे.
कियाच्या एकंदर कनेक्टेड कार विक्रीत ६५% योगदानासह सेल्टॉस आघाडीवर आहे. सेल्टॉस मॉडेल्ससाठीची ग्राहकांची प्राथमिकता देखील कनेक्टेड कार सुविधांनी सुसज्ज प्रकारांकडे झुकत चालली आहे. यामध्ये विकलेल्या सर्व सेल्टॉस गाड्यांपैकी ५७% सामील आहेत. सेल्टॉसच्या पाठोपाठ कॅरन्समध्ये देखील हीच प्रवृत्ती दिसून येते. कॅरन्सच्या ३१% ग्राहकांनी कनेक्टेड कार प्रकार पसंत केला आहे. सध्या सोनेटच्या फक्त ७ प्रकारांमध्येच टेलीमॅटिक्स उपलब्ध असूनही या मॉडेल्सचे एकंदर सोनेट विक्रीत २१% इतके लक्षणीय योगदान आहे. कियाने आपल्या वाहनांमध्ये प्रगत कनेक्टेड कार कार्यक्षमता लागू करून निरंतर नेतृत्व केले आहे.
किया इंडियाचे चीफ सेल्स अँड बिझनेस ऑफिसर श्री. म्युंग-सिक सोन म्हणाले, “आम्ही डिझाईन आणि तंत्रज्ञानातील उत्तमतेच्या बाबतीत मार्केटमध्ये आमच्या ब्रॅंडचे वेगळेपण जपले आहे. आजच्या अति-कनेक्टेड जगात ग्राहकांची अपेक्षा असते की, त्यांची कार त्यांच्या जीवनशैलीला अनुरूप असावी, त्यामुळे तंत्रज्ञान-सक्षम गाड्यांची मागणी वाढली आहे. आमच्या नव्या जमान्याच्या ग्राहकांना सुरक्षित, अधिक कनेक्टेड आणि आनंददायक ड्रायव्हिंगचा अनुभव मिळावा यासाठी आम्ही निरंतर अधिकाधिक कनेक्टेड कार फीचर्स दाखल करत राहू.”
ग्राहकांना आवडणा-या काही अत्यंत लोकप्रिय फीचर्समध्ये हिंग्लिश कमांड, रिमोट विंडो नियंत्रण, रिमोट इंजिन आणि एसी स्टार्ट, व्हॅले मोड आदींचा समावेश आहे.