नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबाद शिवारातील शांतीनगर बस थांबा भागात उघड्या घरात शिरून एकाने सुमारे सव्वा दोन लाखाचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाझिम शेख (रा.गल्ली क्र.१ सादिकनगर,वडाळागाव) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी नलिनी शिवराम साळवे (रा.साई सावली रो हाऊस,पार्थ कॉलनी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
संशयिताने २२ नोव्हेंबर ते ३ फेब्रुवारी दरम्यान वृध्द महिलेच्या उघड्या घरात घुसून कपाटात ठेवलेले सुमारे २ लाख २३ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.