मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राहुल गांधी १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर पहिल्यांदा सभा होणार आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता होणार मुंबईत होणार असून राज्यासह देशातील ‘इंडिया’ आघाडीच्या ३० नेत्यांना या सभेचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. या सभेतून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
दहा तारखेला नंदुरबार येथे सभा होणार आहे. १७ तारखेला शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. सोनिया आणि प्रियंका गांधी या या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातून सुरू झालेली राहुल यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मध्य प्रदेशातून गुजरातमार्गे महाराष्ट्रात येईल.
१० तारखेला नंदुरबार येथील सभा झाल्यानंतर १२ तारखेला धुळ्यात सभा, १३ तारखेला नाशिकच्या काळा राम मंदिरात दर्शन, १५ तारखेला भिवंडीत सभा, १६ तारखेला मुंबईत प्रवेश केल्यानंतर चैत्यभूमी दर्शन घेऊन आणि १७ तारखेला सकाळी दहा वाजता ते गांधी पुतळा ते गेटवे ऑफ इंडिया अशी रॅली काढणार आहेत.